संतांच्या भूमीत अवैध धंद्यांचा सूळसुळाट..
परंतु लोकप्रतिनिधी अनभिज्ञच तर कारवाईवर प्रश्न चिन्ह
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो. 7972420502
रोहा :तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर संतांची,त्यागाची, युगपुरुषांची भूमी जगभर प्रसिद्ध आहे.
स्वयंभू श्री धाविर महाराज्यांचे यात विशेष महत्त्व ओळखले जाते.
अशातच रोहाचा झालेला कायापालट व रोहाला लाभलेले विकास पूरुष त्याचच राज्याच्या राजकीय क्षेत्रात उच्चस्थानी नाव घेतले जाते ते तटकरे कुटुंबियांना आदर्श माणनाऱ्या या रोहा शहरात सध्या तरी अवैध धंद्यावर सुगीचे दिवस आलेले पहायला मिळत आहे.
राजरोस खुलेआम मटका,चक्रिझूगार ऑनलाईन मोबाईल सट्टा तेजीत चालला असून दररोज हजारोंच्या पटीने उलाढाल होत असते अशी माहिती एका जेष्ठ नागरिकांकडून मिळाली.
या खेळात जेष्ठासह तरुणाईलाही ओठ लागल्याने भविष्यात रोहाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
गेल्या चार वर्षांपासून अनेक घातपातच्या घटणांचा अभ्यास केला तर असे अढळून येईल की तरुणांचे मृत्यूचे कारण झुगारात हरल्याने व्यसनाधीन झाले आणि पच्छातापात अथवा घातपातात जीव गेल्याचे उघड झाले असल्याचे बोलले जाते.अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत
त्यातच रेती माफिया,मातीमाफिया, अवैध बिल्डबलाॅबी, शासकीय कामात अफार,व अनियमितता, असे अनेक प्रकाराची प्रकरणे उघड होतांना दिसत आहेत.
अशा परिस्थितीत कुठेही ठोस कारवाई होतांना दिसत नाहीत हि शोकांतिका आहे.ही परिस्थिती सूद्धा नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावा…
रोहाचा इतिहास पहाता अशा प्रकाराने रोह्याच्या प्रतिमेला डाग लागण्याचे कार्य चालू आहे अशा अवैध कारोबारावर लोकप्रतिनिधी अंकुश घालावा अशी नागरिकांची मागणी असून त्याची पूर्तता होईल का..? की पाठीशी घालणार हा संशोधनाचा विषय बनला आहे.
तरी याचा गांभिर्य लक्षात घेऊन अनभिज्ञच न रहाता व कार्यकर्त्यांची मर्जीने न वागता सद्सद्विवेक बाळगून या अवैध प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करुन हा निंदनीय प्रकारास आळा बसेल असे कार्य केले तर आपले कार्य सत्कारणी लागेल.
अशी रोहा तालुक्यातील सर्वच स्तरांतून नागरिकांची मागणी आहे.