रिद्धपूर ते जालनापुर रस्त्याच्या कामात झाला भ्रष्टाचार
दोशींवर कार्यवाही करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल
ग्रा. सदस्य भूषण निमकर
✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
📰 मोर्शी तालुका प्रतिनिधी 📰
📱 8600650598 📱
चांदुर बाजार : – रिद्धपूर ते जालनापुर या रस्त्याच्या डांबरीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जालना पूर ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी चांदूरबाजार यांनी दिनांक 13/ 6 /2022 या रोजी मुख्याधिकारी,जिल्हा परिषद कार्यालय अमरावती यांना चौकशी आणि कार्यवाहीची मागणी केली होती.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याच्या चौकशी संदर्भात सरकारी काम सहा महिने थांब या प्रचलित म्हणीनुसार शेवटी अडीच महिने उलटल्यानंतर दिनांक 22/8/2022 या रोजी चौकशीचा मुहूर्त ठरला.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग दर्यापूर येथील उपअभियंता यांच्या समितीने या रस्त्यावर येऊन शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत खराब झालेल्या एकूण आठ ठिकाण चे खड्डा खोदून सॅम्पल घेण्यात आले आणि पंचनामे करण्यात आले. खड्डा खोदलेल्या काही ठिकाणी कुठे मुरूम तर कुठे माती असल्याचेआढळून आले. या रस्त्या संबंधित अभियंता श्री वानखडे साहेब यांना ग्रामस्थांनी चौकशीच्यावेळी या कामाचा बॅच रिपोर्ट आणी डांबराचे तापमान मोजल्याचे रेकॉर्ड मागितले असता त्यांच्या कडून काहीच मिळाले नाही. या रस्त्याची वाट लावण्यात अभियन्ता वानखडे साहेब यांचा सिहाचा वाटा आहे.
या रस्त्या संबंधित कंत्राटदार अभियंता आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करण्याकरिता पाठिंबा आणि बळ दिले आहे. त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे
आता या रस्त्याबाबत अहवाल किती महिन्या नन्तर् येणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
यावेळी भाजपा पदाधिकारी चांदूरबाजार आणि जालनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भूषण निमकर आणि सौ रश्मी राहुल कडू यांच्यासोबत सतीश हिवसे,ज्ञानेश्वर राव काळे, प्रवीण भाऊ वानखडे, शुभम लेवलकर, शाम सूर्यवंशी, श्रीकांत घाटोळ, सागर अंबाळकर, सोपान भाऊ घाटोळ, निलेश भाऊ निमकर, राहुल भाऊ कडू, परीक्षीत अंबाडकर सौरभ् निमकर, चेतन् नान्दन्कर् आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.