आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मेडिगड्डा धरणा विषयी लक्षवेधी मांडले! मेडिगड्डामुळे पाणी शेतीत शिरकाव केल्याचे गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मेडिगड्डा धरणा विषयी लक्षवेधी मांडले!
मेडिगड्डामुळे पाणी शेतीत शिरकाव केल्याचे गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मेडिगड्डा धरणा विषयी लक्षवेधी मांडले! मेडिगड्डामुळे पाणी शेतीत शिरकाव केल्याचे गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले

अहेरी तालुका प्रतिनिधी
स्वप्निल श्रीरामवार
मो न 8806516351

सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा धरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेच्या खाईत ढकलल्या जात आहे त्यातच तब्बल एक एक आठवडा पाणी उभ्या पिकात राहत असल्याने उभे पिके पाण्यात बूडत आहे या करिता नुकसान भरपाई आणि कायमस्वरूपी उपाय योजना करण्याकरिता आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी बुधवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडले.
मेडिगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुका वासियांसाठी शाप ठरत असून शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिके दरवर्षी पाण्याखाली बूडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. दरवर्षी शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय योजना आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे योग्य मोबदला मिळावे यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पावसाळी अधिवेशनाच्या लक्षवेधीच्या सत्रात मेडिगड्डा धरणासबंधी समस्या उपस्थित करून गंभीर प्रश्न उपस्थित केले.
आधीच शेतकरी चिंतातुर व हवालदिल झाले असून त्यात मेडिगड्डा प्रकल्प शेतकऱ्यांना मारक ठरत असून या गंभीर व महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे वाचा फोड़ण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यानी लक्षवेधीत प्रश्न मांडून विधिमंडळ सभागृहाचे व राज्यशासनाचे लक्ष वेधले.