सरपंचानी केला सहकारी सदस्यांचा ग्रामसभेत अपमान
“ग्रामपंचायत मोखाळ्याच्या सरपंचाचा मनमानी कारभार”
बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
7263907273
सावली:: तालुक्यातील मोखाळा ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच पार पडली, यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,,काही विषयावर ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी आक्षेप घेतला असता, सरपंचांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, जिल्ह्यातील दारुबंदी उठल्यानंतर नदी काठच्या गावात दारुचे दुकान सुरू करण्यात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या चढा ओढ दिसून आली यातच सरपंचाला हाताशी धरून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अर्थपूर्ण चर्चा सुध्दा करण्यात आल्या, दारु व बिअर शापीचा विषय ग्रामसभेत नाहरकत साठी सरपंचानी ठेवला ,परंतु सदर विषय मासिक सभेत न ठेवता,ग्राममसभेत कसे काय,? असे सदस्यांनी विचारले असता सरपंचानी तुम्हाला विचारण्याची गरज नाही , म्हणून ग्रामसभेत सदस्यांचा अपमान केला ..
सविस्तर असे की, मोखाळा ग्रामपंचायत अंतर्गत एक बिअर शापी, व एक देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी सरपंचानी स्व हित लक्षात घेऊन नाहरकत प्रमाणपत्र दिले, याबाबत ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कोणत्याही प्रकारचे विषय न ठेवता परस्पर नाहरकत प्रमाणपत्र सरपंचानी दिले, तसेच या विषयी ग्रामसभेत सरपंचानी विषय मांडला असता ,ग्रामस्थांनी ,तुम्ही मासिक सभेत विषय मांडला का ,? असे विचारणी केली असता ,सर्व सदस्यांनी आम्हाला या विषय काही मा हीती नाही ,त्यावरून सरपंचाची मनमानी दिसुन येत होती..
सरपंचानी यावेळी मी थेट जनतेतून निवडणून आलो आहे ,मला सदस्यांला विचारण्याची काही गरज नाही ,तसेच यापूर्वी मी नाहरकत प्रमाणपत्र कोणालाही न विचाराता दिले, परंतु शासन निर्णयामुळे मी ग्रामसभेत हा विषय मांडला ,याला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असल्याने सदर विषय मी आपल्या समोर ठेवला असे सरपंचाने सांगितले ,यात सरपंचाची मनमानी दिसून येत होती.यावर सदस्यांनी आवाज उठविला असता सरपंचाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली व सरपंचाचे विविध प्रताप गावकऱ्यांसमोर विशद केले, यात सरपंचाने बिअर शापी कडुन 10 क्विंटल लोहा , मंदिर बांधकाम साठी व देणगी स्वरुप 21 हजार रुपये घेतल्याचे बिंग फुटले , ग्रामपंचायत सरपंच,सदस्यांना विश्वासात न घेता स्वतः करीत असल्याचा आरोप त्यांनी सदस्यांनी केला..
ग्रामपंचायत सदस्यांनी विविध कामावर आक्षेप घेतला असुन सरपंचाविरोधीत न ऊ सदस्य आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात सरपंचावर अविश्वास दाखविण्याची तयारी सुरू केली असुन वरीष्ठ नेते कोणती भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे…