यारी दोस्ती ग्रुप सदस्यांनी रुग्णासाठी रक्तदान करून भागवली रक्ताची गरज

पालघर प्रतिनिधी

सुनिल जाबर 

 जव्हार तालुक्यातील मेढा पाटिल पाडा, साखरशेत येथील चंदू मधुकर डोके (वय ४५ वर्ष) हे रुग्ण उपचारासाठी पतंगसहा कुटीर रुग्णालय जव्हार येथील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत. यावेळी त्यांना B+ रक्ताची नितांत आवश्यकता भासत होती, परंतु हे रक्त उपलब्ध होत नव्हते म्हणून त्यांना डोनर ची गरज लागत होती. हा डोनर मिळावा म्हणून फेसबुक वरून त्यांनी “यारी दोस्ती” या ग्रुपशी संपर्क केला. 

रक्ताची तत्काळ आवश्यकता भासत असल्यामुळे “डोनर मिळावा” असा मेसेज लगेचच ग्रुप वर पाठविण्यात आला. मेसेज बघितल्यावर ग्रुप मधील श्री. सागर सातवी (वाघाडी डहाणू) हे सदस्य रक्तदान करण्यास तयार झाले. त्यांनी आपल्या घरून ७० किमीचा प्रवास करून जव्हार येथील रक्तपेढीत रुग्णासाठी रक्तदान केले. रुग्णांसोबत कोणतेही नाते नसताना सामाजिक कर्तव्य म्हणून निस्वार्थ भावनेने एवढ्या लांब प्रवास करून रुग्णाला लागत असलेली रक्ताची गरज तत्काळ भागविण्यासाठी रक्तदान केले. 

यारी दोस्ती फाऊंडेशन मार्फत सर्व सामाजिक कार्य करण्याची आवड असलेल्या मित्राचा *”यारी दोस्ती ग्रुप”* या नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर आलेला मेसेज बघून सदस्य रक्त देण्यास तयार होतात.

     या रक्तदानाबद्दल सदर रक्तदात्याचे आणि यारी दोस्ती ग्रुप चे रुग्णाच्या नातेवाईकांनी खूप खूप आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here