मुलचेरा तालुक्यातील गट्टा गावात नरभक्षक वाघाच्या हल्यात पाळीव गाय ठार,  वन विभागाने तात्काळ वाघाला जेरबंद न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुलचेरा येथे तीव्र आंदोलन छेडणार, शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचे आव्हान 

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मो.नं.9405720593

दिनांक २४/०८/२०२३ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचा ताफा अहेरी येथून मुंबईसाठी रवाना झाले असता मुलचेरा तालुक्यातील गट्टा गाव येथे ताफा थांबवून २२ ऑगस्ट रोजी झालेल्या वाघाच्या भ्याळ हल्ल्यात श्री. केशव मुहंदा यांची एक पाळीव गाय ठार झाली त्या संबंधात श्री. केशव मुहंदा यांच्या राहते घरी भेट घेऊन या संपुर्ण घटनेची माहिती घेण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी मुहंदा परिवाराला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार तसेच मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, हेटळकसा, वेंगनुर, देवदा, सुरगाव, गरंजी, रेगडी लागतच्या एटापल्ली तालुक्यातील या सर्व परिसरात भीतीचे वातावरण या नरभक्षक वाघामुळे निर्माण झालेले आहे.

यामुळेच या परिसरातील शेतकरी बांधव शेतावर जाणे बंद केल्याने शेत पिकांची हानी होत आहे तसेच मुलचेरा बोलेपल्ली मार्गाने जाणारे सायकलस्वार, दुचाकी स्वार, आणि पायी जाणारे लोक वाघाच्या दहशतीने ये-जा करणे बंद आहे. असे असताना वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेली यंत्रणा मंदगतीने काम करीत असल्याने नरभक्षक वाघाला पकडण्यास अपयशी ठरत आहे. जर या नरभक्षक वाघामुळे त्या संपूर्ण परिसरामधील कुणाच्या ही जीवास हानी झाल्यास वन विभाग अधिकारी व कर्मचारी यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने घेराव करण्यात येईल. या गंभीर प्रकरणात शासनाने तात्काळ दखल घ्यावी असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख श्री धर्मा रॉय, उपजिल्हाप्रमुख श्री अक्षय पुंगाटी, तालुकाप्रमुख मुलचेरा नीलकमल मंडल, तालुकाप्रमुख एटापल्ली मनीष दुर्गे, तालुकाप्रमुख सिरोंचा उज्वल तिवारी, तालुकाप्रमुख अहेरी सुनील वासनिक, शहर प्रमुख अहेरी आयान पठाण, मुहंदा पाठील गट्टा, करण मुहंदा शाखाप्रमुख गट्टा असंख्य गावकरी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here