स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

डहाणू :- डहाणू तालुक्यातील तवा गारवा रिसॉर्ट येथे 24 ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य बैठकीत शिवसैनिकांनी एकमुखी निर्धार व्यक्त केला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून भगवाच फडकणार.
शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले पालघर-डहाणूतील जनता शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. येथील प्रश्न व विषयांची सोडवणूक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कणखर नेतृत्वाखाली होत आहे आणि यापुढेही होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांना पक्षाची जबाबदारी सोपवून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीला पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, सहसंपर्कप्रमुख केदार काळे,जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख, पालघर विधानसभा संघटक विराज गडग,हितेश पाटील,अभिजित देसक,उप तालुका प्रमुख राजेश कासट व दिनेश बोलाडा,शिलिंद लहांगे,दिपाली धनमेहर, नम्रता धनमेहर, कुवरा, सुभाष चौरे, शैलेश हाडळ, कासा शहर प्रमुख रघुनाथ गायकवाड,संजू धिंडे,गणेश गावित, अतुल नाईक, राजकुमार गिरी,विभाग प्रमुख एकनाथ सोनकले,उप तालुका प्रमुख सुधीर घाटाळ,गणेश ठाकरे,तसेच सरपंच, उपसरपंच यांसह तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन ऍड. विराज गडग यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली.