नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार तर्फे शालेयसहित्य वाटप
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार नाका याच्या तर्फे रायगड परिषद शाळा चिंचवली (आदिवासी वाडी)येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
या मंडळाकडून सामाजिक बांधिलकीची, आणि विकासाची कामे होत असतात. चालू वर्षी मंडळाकडून रायगड परिषद शाळा चिंचवली (आदिवासी वाडी)येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच पालकांच्या, शिक्षकांच्या आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या सभासदांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. मंडळाकडून आतापर्यंत श्रमदान, रक्तदान, पाणपोई बनवणे, मंडप व्यवस्था, अन्नदान, वृक्षारोपण, स्थानिक मंदिरांना मदत अशी कामे करून आपला आदर्श खारेपाटात ठेवला आहे. वह्या वाटपाचा कार्यक्रम शाळेमध्ये पार पडला तेव्हा शाळेच्या शिक्षिका सौ. संजीवनी पाशीलकर आणि संदेश जाधव गुरुजी उपस्थित होते. पालकांकडून सुगंधा नाईक,सुंदरा वाघमारे, जिंदगी वाघमारे आणि वैष्णवी हे हजर होते. मंडळाचे संजय पाटील, समीर पाटील, राजेंद्र पाटील, अमेय पाटील, नानचे यांची उपस्थिती होती. असाच वह्या वाटपाचा कार्यक्रम पाटील ट्रेडर्स यांच्या घरी देखील संपन्न झाला. व या वाटपाच्या कार्यक्रमात एकूण 195 विद्यार्थ्यांना लाभ घेतला होता.