*हिंगणघाट मधिल जनतेच्या सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा, विदर्भ बिरो चिप प्रशांत जगतापच आवाहन*
हिंगणघाट:- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जनतेच्या हलगर्जी व्यवहारामुळे कधी शहरात कोरोना वायरसच्या मोठा विस्फ़ोट होईल यांच्या अनुमान लावला जात आहे. शहरात संक्रमण वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने आज पासुन लागु करण्यात आलेल्या 7 दिवसीय हिंगणघाट शहरातील जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन मिडिया वार्ता न्यूज चे विदर्भ बिरो चिप प्रशांत जगताप यांनी केले आहे.
दिनांक 25 सप्टेंबर शुक्रवार पासुन 1 अक्टोबर गुरवार पर्यंत सार्वजनीक स्थिकानी फिरू नका. तोड़ाला मास्क लावा, सैनिटायझरचा वापर करा. सार्वजनीक रित्या लोकांन पासुन दुर रहा. शहरातील कोविडचा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी शहरातील सर्व समाजिक कार्यकर्ते जनप्रतीनिधी आणी व्यापारी संघटना मिळुन यांनी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत आहे. मात्र काही ठिकाणी बेजबाबदार वर्तनही दिसून येणार आहे. त्यांना समजदारीने समजून सांगुन त्यांना पण या जनता कर्फुच महत्व सांगीतल पाहिजे.