*नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच साम्राज*
सात दिवसात काम न झाल्यास रास्तारोको आंदोलन करू.
हिंगणघाट: मुकेश चौधरी
नागपुर राष्ट्रीय महामार्गावर 44 वर मोठ्या प्रमाणात खड्डेचे साम्राज दिसून येते, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण खड्डेमय रस्त्यावर टोल वसूल करून जनतेची लूट करत आहे. महामार्गावर वर खड्डे पडले आहेत, ते बघता दुरुस्ती-देखभाल न केल्याने टोल वसुली बंदच करायला हवी; मात्र तसे होत नसल्याने किमान रस्ते दुरुस्त करण्याची गरज असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. हा सरळ सरळ नियमभंग असतानादेखील महामार्ग प्राधिकरण मूग गिळून बसले आहे. यांना जागे करण्याकरिता हिंगणघाट विधानसभा युवक काँग्रेस तर्फे जिल्हा उपाध्यक्ष अमित चाफले यांचा नेतृत्वात दारोडा टोल प्लाझा येथे जाऊन प्रबंधक चौहान तसेच मेंटन्नस इन्चार्ज उंबरकर यांना निवेदन देऊन, जर सात दिवसात काम पूर्ण झालं नाही तर टोल नका बंद करू अशी ताकीद देण्यात आली.
महामार्गाचे चौपदरीकरण खासगीकरणातून करून त्या बदल्यात संंबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे शासनाला रस्त्यासाठी किंवा टोल कालवधीपर्यंत देखभाल दुरुस्तीचा खर्च करावा लागत नाही, असा नियम आहे.
परंतु त्याला कंपनीने हात लावलेला नाही आणि टोल वसुली मात्र सुरू आहे. त्यामुळे एक तर रस्ते सुधारावेत किंवा टोल बंद करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात हे धोरण कागदावरच आहे, ज्या कंपन्या रस्ते तयार करून टोल वसूल करतात, त्याच कंपन्या नंतर रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष
करतात. निवेदन देते वेळी युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष नकुल भाईमारे, विधानसभा उपाध्यक्ष पंकज पाके, विधानसभा महासचिव श्रीकांत देवलपल्लिवार, सचिव शैलेश मैंद समुद्रपुर तालुका अध्यक्ष गौरव उरकूडे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष नितेश घुबडे,हिंगणघाट शहर अध्यक्ष अंकुश कुचनवार, सोशल मीडिया अध्यक्ष गौरव दुधनकर उपस्थित होते.