आरसा
रविवारी सकाळी सकाळी तिचा फोन आला…आज भेटतेस please ? थोडं personal काम होतं…
“ती”…म्हटलं तर मैत्रिण, म्हटलं तर फक्त business acquaintance!
काय काम असेल हिचं माझ्याकडे ?
खुप हुशार आणि successful CEO, उच्चभ्रु कुटुंबात लहानाची मोठी झालेली, स्वतःच्या कर्तुत्वाने समुद्रापार पोहोचलेली, दोन गोंडस चिमण्यांची आई आणि राजाची लाडावलेली राणी, पंचेचाळीशी ओलांडून पण कायम पस्तिशीत दिसणारी, परीकथेत शोभेल असं साजरं आयुष्य जगणारी ती….
मी पोहचायच्या आधीच ती येऊन बसली होती, चेहेऱ्यावरचा नेहेमीचा उत्साह मावळलेला होता, गोऱ्या रंगावर निराशेचे ढग दाटलेले…
काय बोलायचं असेल हिला माझ्याशी ? तेही personal ..? मला काहीच अंदाज येईना….
बहुदा माझ्या मनातले प्रश्न तिने वाचले….
हसून ती म्हणाली “विचार करू नकोस, तुला विषयाचा अंदाजच येणार नाहीये, मला बोलुदे” मी सरसावून बसले…
फक्त ऐकण्यासाठी.
तिने सुरुवात केली
“माझा एक मित्र आहे…
sorry होता. चार महिन्यांपूर्वी अचानक heart attack ने जग सोडून गेला.फक्त ४६ व्या वर्षी आयुष्य संपवून गेला. आम्ही ५व्या इयत्ते पासुन ते engineering पर्यंत बरोबर होतो.
तो आयुष्यात नाही असा दिवसच मला आठवत नाही. आसपासचं जग काळाच्या ओघात बदललं तरी तो constant होता. तो गेल्यावरच जाणवलं, की त्याचं नसणं किती भयानक असू शकतं. मी गृहीत धरलं होतं त्याचं असणं, कुठे जाणार हा !!
असाच विचार कायम केला. माझी engineering ची branch निवडण्यापासून ते माझ्या पहिल्या कंपनीचं नाव ठरवण्यापर्यंत सगळे निर्णय त्यानेच घेतले.
आमच्या दोघांच्याही घरी वाटायचं कि आम्ही लग्न करणार,
पण आम्हाला मैत्रीच्या पलीकडे एकमेकांबद्दल काहीच वाटलं नाही.
माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडले तेही सगळ्यात आधी त्यालाच सांगितलं आणि त्याने approval दिल्यावरच “हो” म्हटलं.
सगळ आहे गं जागच्या जागी, पण तरी पोकळ झालंय सगळं. तो गेल्यावरच जाणवलं, माझ्या साठी तो किती महत्वाचा आहे हे! त्याला सांगायचं राहून गेलं…
हसत असशील ना मला मनातल्या मनात ?
इतकी मोठी बाई, हे काय बडबडते आहे म्हणुन ?
गोष्ट इथे संपली नाहीये, काल त्याचा वाढदिवस होता, साहजिकच डोळ्यात पाणी होतं दिवसभर, त्यावर सासूबाई चिडुन म्हणाल्या, ३ महिने झाले, त्याची बायको सुद्धा सावरली, तरी हिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. मान्य आहे जवळचा मित्र होता पण घरातलं माणूस किंवा आई वडील गेल्याच्या वरताण सुतक आहे हिच्या चेहेऱ्यावर! कशी गम्मत आहे बघ,
घरातलं माणुस किंवा आईवडील गेल्यावर झालेलं दुखं समाज मान्य करतो पण मित्र गेल्यावर तितकंच किंवा जास्त दुख झालं तर ते मान्य होत नाही.”
बराच वेळ ती शांत होती…मी हळुच तिचा हात हातात घेऊन बरंच काही बोलले, सांत्वन केलं आणि म्हटलं “एक विचारू ? आपण फार ओळखत नाही एकमेकांना, मी वयाने पण लहान आहे… मनातली इतकी खोलवरची गोष्ट माझ्याशीच का बोलाविशी वाटली ?”
ती शांत हसली… “hmm दोन कारणं आहेत तुझ्याशी बोलायची…साधारण तीन वर्षापूर्वी women entrepreneurs च्या एका workshop मध्ये spontaneous talk च्या वेळी तुला topic आला होता
“friendship beyond friendship” आठवतंय ?
त्या दिवशी पहिल्यांदा Olive च्या पलीकडची ऋजुता मी notice केली, तुझ्या FB च्या पोस्ट मी नियमित वाचते….मी इतकंच म्हणेन …तुला मैत्री समजली आहे… आणि माझं दुख अश्याच माणसाला समजु शकतं ज्या माणसाला मैत्रीचा अर्थ आणि महत्व समजलंय.”
खुप मोठ्ठी compliment होती ही…डोळ्यात पाणी घेऊन गाडीत बसले…आणि गाडी पेक्षा विचारांना गती आली….
शाळा कॉलेज मधली धमाल मैत्री ओलांडुन पुढे आल्यावर, आयुष्य जरासं स्थिरावल्यावर, तिशीच्या उंबरठ्या नंतर आपण खरंच काय शोधतो मैत्री मधे ? फोन वरच्या, CCD मधल्या, ग्लास हाहात घेऊन मारलेल्या अघळ पघळ गप्पा ?? बास इतकंच ? नाहीच मुळी !!
वाईट वेळ आली तर नातेवाईक सोडुन आपल्यापैकी जवळ जवळ सगळेच मित्रांचाच धावा करतील.
जगाने जरी पाठ फिरवली तरीही पाठीशी उभी राहतील अशी किती माणसं कमावतो आपण ?
जी घर, गाडी आणि पैशाला बघून नाही तर आपल्या एका हाकेसाठी धावून येतील ? ज्यांना आपल्या वागण्याचं explanation द्यावं लागत नाही
मित्र मैत्रिणी शिवाय जगता येतं ? कुणालाही विचारलं तरी उत्तर नाहीच येईल…
तरीही त्या नात्याला समाजात सन्मान मात्र नाही. आमची generation शेवटचीच जीने friendship day शिवाय मैत्री celebrate केली. ज्या पिढीनी best friend-close friend ची बिरूदं पहिल्यांदा मिरवली.. आणि ती धुरा सतत एका माणसाकडून दुसऱ्याकडे जाणार नाही ह्या साठी जीवाचा आटापिटा केला…friendship breakup पण प्रेमाच्या breakup इतकच painful असतं हे समजलेली…माझी पिढी बहुदा एकमेव असेल.
मनासारखा जोडीदार मिळाल्यावर best friend ची जागा काहीशी मागे सरकत असेलही, पण ती डळमळीत मात्र होता कामा नये. समोर आलेल्या चांगल्या वाईट situation मधे जोडीदार बरोबर असतोच…to face that situation & consequences..but while passing through hard times…you need someone who will hold your hand & offer the confidence to win over it. who will reassure how worthy you are, who is always there yet far away from facing the actual situation. who knows when to hold a hand tight & when to leave it…
थोडक्यात काय ! आपल्याला best friend नावाचा एक आरसा हवा असतो…कायम खरं बोलणारा आरसा… आज तू सुंदर दिसतेस इतकंच न सांगता तू सुंदरच आहेस ह्याची जाणीव करून देणारा, तर कधी प्रतिक्रिया न देता फक्त ऐकून घेणारा, हसऱ्या चेहेऱ्या मागचं दुख जाणणारा, हक्कानी सोबत करणारा आणि एकटेपणाची गरज असताना ती समजून बाजूला होणारा, आपण खरे कसे आहोत ह्याची लाज न वाटता कबुली देता येईल असा, सतत बदलणारी आपली रूपं तितक्याच समंजसपणे सामावून घेणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, झालेल्या चुकाही माफ करून आपलंसं करणारा, आपण एकटे नाही ही जाणीव सतत देणारा, आपल्या सामर्थ्याची परत परत आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी फक्त खरं तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे “तो” किंवा “ती” च्या पलीकडचं नातं असणारा..निर्मळ आरसा..
चेहेऱ्यावर मुखवटा चढवायची किंवा रंगरंगोटी करायची वेळ आली तरी आपण आरश्यासमोर गेल्या शिवाय ती नाहीच करू शकत…
किमान एकतरी आरसा नक्की हवाच प्रत्येकाला..!!
तो असतोही बरेचदा….
पण नुसताच तो आरसा असुन काय उपयोग?
त्या आरशालाही पुसुन लख्ख ठेवायला नको का ?
आपण कधीच त्या आरशाला जाणीव करून देत नाही कि तो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. सांगायचं असूनही बाजुला राहिलेलं बरंच काही असतंच कि प्रत्येकाकडे…
facebook किंवा whatsapp वर ईमोजी पाठवले म्हणजे व्यक्त होणं नाही ह्याची जाणीव आपल्यला कोण करून देईल ? त्या आरशावर रागाच्या, अपमानाच्या, गृहीत धरल्याच्या, दुर्लक्षित केल्याच्या टिकल्या चिकटलेल्या नाहीत ना हे निरखुन बघितलं आहे कधी ? जुन्या वादांचे, भांडणांचे पुसट ठसे प्रेमाने पुसले आहेत कधी ? त्याच्या अस्तीवाची, त्याला आपल्या आयुष्यात असलेल्या स्थानाची करून दिलेली जाणिव, मनापासुन व्यक्त केलेल्या भावनांची अलगद फुंकरही पुरेशी आहे….स्वच्छ पुसलेला चकचकीत आरसा आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे..हे किती सहज विसरतो आपण !!
विचारांची साखळी संपली तरी फक्त १५ किलोमीटरचा रस्ता संपता संपत नव्हता…मला घरी जायची घाई झाली होती…. अभिमान वाटला ..!!
माझ्याकडे फक्त एकच नाही, तर बरेच आरसे आहेत त्या सगळ्यांकडे मला व्यक्त व्हायचं आहे,
त्यांनाच परत एकदा लख्ख करायचं आहे…
उशीर होण्या आधी !!!
माझ्या सगळ्या मित्र/मैत्रीणींसाठी..