*काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात विदर्भाच्या सपुत्र शहीद*

नागपुर:प्रशांत जगताप:- विदर्भाचे सपुत्र उमराव बडोले वय ४९ काल काश्मीरमधील मधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. ते गोंदियाचे मुळ रहवासी होते. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या सीआरपीएफ ११७ बटालियन मध्ये ते कार्यरत होते.
काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले हे हुतात्मा झाले. ते मूळचे विदर्भातील गोंदियाचे होते. सध्या त्यांचे कुटुंब नागपूरात राहते. हल्‍ल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची बंदूक हिसकावून घेतल्याचे समजते.
बडगाममधील कैसरमुल्ला भागात ‘सीआरपीएफ’ च्या ११७ व्या तुकडीवर सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात बडोले जखमी झाले. त्यांना विशेष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्‍ल्यानंतर पलायन करणाऱ्या दहशतवाद्यांनी बडोले यांची बंदूक हिसकावून नेली. या घटनेनंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदियाचे जवान नरेश उमराव बडोले वय ४९ शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या सीआरपीएफ ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी असल्याचे वृत्त होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. आज दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी लढताना बडोले यांना वीरमरण आलं. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये सीआरपीएफच्या ११७ व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी फायरिंग केलेला परिसर सील करण्यात आला असून, दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. नरेश बडोले नागपूर येथे राहणारे असून विवाहित आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here