महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा राजुरा तालुका अध्यक्ष रेती चोरांचा म्होरक्या पोलिस स्टेशनमध्येच मुला सह घुसून देतो जीवे मारण्याची धमकी

46

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा राजुरा तालुका अध्यक्ष रेती चोरांचा म्होरक्या

पोलिस स्टेशनमध्येच मुला सह घुसून देतो जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा राजुरा तालुका अध्यक्ष रेती चोरांचा म्होरक्या पोलिस स्टेशनमध्येच मुला सह घुसून देतो जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा राजुरा तालुका अध्यक्ष रेती चोरांचा म्होरक्या
पोलिस स्टेशनमध्येच मुला सह घुसून देतो जीवे मारण्याची धमकी

कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906

:- सविस्तर वृत्त असे की दिनांक:- २४/०९/२०२१ रोजी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे हे दिवसभरातील पक्षाचे कामकाज आटपऊण रात्रीच्या सुमारास वेळ ११:३१ ला आपल्या सहकाऱ्यांसोबत राजुरा ते चंद्रपूर जात असताना मुख्य मार्गालगत स्वामी येरोलवार यांच्या वाडी जवळ लघु शंके करिता थांबले असताना तेथे काही ट्रॅक्टरचा आवाज आल्याने सदर प्रकरण नेमके काय आहे? हे सहकार्‍यांसोबत जवळ जाऊन बघितले असता दोन ते तीन ट्रॅक्‍टर सर्रासपणे अवैध रेतीची वाहतूक करताना आढळले, ट्रॅक्टर चालकांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे त्यांनी सांगितले या अवैध रेती तस्करी चोरी प्रशासनासमोर आणण्याकरिता जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी मोबाईल ने व्हिडिओ शूटिंग घेत असताना तेथील काही ट्रॅक्टर चालकांने त्यांची चोरी उघडकीस येऊ नये याकरिता जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांना दम दाखवत अरेरावी करून शिवीगाळ केली व जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना ट्रॅक्टर चालकाने ” तू तहसीलदार आहेस काय? आम्ही राजुरा ट्रॅक्टर युनियन असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका अध्यक्ष राजुरा श्री. राजू डोहे यांची माणस आहोत. आणि सत्ता आमची आहे..!! तुम्हाला काय वाकड करायचे ते करून घ्या अशा प्रकारची दमदाटी करतात “चोरी तर चोरी वरून सीना जोरी” जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे व यांच्या सहकार्‍यांसोबत केली. विशेष म्हणजेच घटनास्थळी आढळलेली ट्रॅक्टर्सचे नंबर प्लेट सुद्धा स्पष्ट दिसत नव्हते जर दुर्दैवाने या ट्रॅक्टर्स ने अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर गाडी चालकावर कार्यवाही करण्याकरिता गाडीचा कोणता नंबर सांगायचं? असा गंभीर प्रश्न या वेळेस जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी उपस्थित केला. व घटनास्थळी घडलेल्या सदर प्रकरणाची तक्रार जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी राजुरा पोलीस स्टेशन येथे दिली. त्यावेळेस राजुरा पोलीस स्टेशन येथे राजुरा ट्रॅक्टर युनियन असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका अध्यक्ष राजुरा श्री. राजू डोहे यांनी सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करून ते स्वतः देखील या तस्करी मध्ये सामील असल्यामुळे मी शिवसेनेचा तालुका अध्यक्ष आहे! आम्ही सत्तेत आहो आमच्याशी खाजवणे महागात पडेल अश्या धमक्या देऊन चोरीला बढावा देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. व पोलिस स्टेशनमध्येच आपल्या मुलासह घुसून जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देत आपल्या पदाचा गैरवापर करून अवैद्य धंद्याला बढावा देत स्वतःला जनप्रतिनिधी म्हणून घेणारे राजू डोहे यांनी पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले. सदर प्रकरणावरून राजू डोहे सारखे व्यक्ती सत्तेत असणाऱ्या शिवसेना पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष व स्वतःला जनप्रतिनिधी म्हणून घेत आपल्या पदाचा गैरवापर करत अवैध रेती तस्करी मध्ये स्वतः देखील सामील होऊन शासनाचा महसूल बुडविण्याचे काम केल्याचे स्पष्ट होते. चोरी वर पडदा टाकणाऱ्या व आपल्या स्वार्थासाठी लोकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याकरिता जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी धडा शिकवण या करिता यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता नेहमीप्रमाणे निडरपणे आपल्या लढवय्या स्वभावामुळे सदर प्रकरण प्रशासनाच्या समोर आणून गुन्हेगारांवर प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याचे सांगितले. व याच बरोबर ट्रॅक्टर वर व चालकावर कारवाई करण्याकरिता रात्रीच्या वेळी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्याकरिता कोणाशी संपर्क साधावा असा क्र. आम्हाला देण्यात यावा अन्यथा एक स्वतंत्र पथक तयार करण्यात यावा ही देखील विनंती यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी केली.