संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे विशेष मोहिम राबवत जलतगतीने मार्गी काढा – आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत सूचना

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत सूचना
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे : संजय गांधी निराधार योजनेतील शहरी भागातील तहसीलदार यांचे पद रिक्त असल्यामुळे सदर योजनेतील प्रकरणे प्रलंबित आहे. त्यामूळे येथे अधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी सोबतच विशेष मोहिम राबवत प्रलंबित असलेली प्रकरणे जलतगतीने मार्गी काढण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेऊन केल्या आहेत. यावेळी सदर योजनेच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांना होत असलेल्या अडचणींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे
संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत येणारी प्रकरणे मार्गी काढण्यासाठी शहरी व ग्रामीण अशी दोन तहसीलदार नेमण्यात आले आहे. मात्र सदर योजनेतील शहरी भागातील तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परिणामी संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत वृद्ध निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त तसेच स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्यांना परंतु पोटगी न मिळालेल्या महिला व इत्यादी पीडित व पात्र लाभार्थी शासनाच्या आर्थिक योजनेपासून वंचित आहे. हजारोच्या संख्येने या योजनेतील पात्र लाभार्थी केवळ रिक्त असलेल्या पदामुळे वंचित राहणे योग अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत