सिंचन उपविभाग पुसद यांच्या हलगर्जीपणामुळे झिरपुरवाडी पाझर तलाव फुटला;
शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान

शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान
राम राठोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
✍🏻9422160416✍🏻
दिग्रस तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या झिरपुरवाडी पाझर तलाव रात्री झालेल्या मुसळधार पावसाने फुटला.आणि शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.तसेच गावाला पाणी पुरवठ्याची विहीर गाळली व मोटर पंपसह साहित्य वाहून गेले.९ सप्टेंबर ला तलावाची भिंत सारस पक्षाने पोखरल्याने . तलाव लिकेज झाला.त्यावेळी सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातुरमातुर काम करून लिपापोती केली. तेव्हा भिंतीचे काम मजबूत करा असे सरपंचांनी सांगितले असता जिल्हा परिषद सिंचन उपविभाग पुसद येथील शाखा अभियंता यांनी तलाव फुटणार नाही. अशी भविष्यवाणी केली होती.आणि नंतर फिरून ही पाहिले नाही. तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास मात्र हिरावला.सोयाबीन, कापुस व तुर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले. प्रभारी तहसीलदार बन यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.आणि पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तलाठी चंदेल यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल आजच सादर केला.