माणगांव पोलिसांनी गजाआड केली बिबट्यांच्या नखांची विक्री करणारी टोळी

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-दि 21 सप्टेंबर रोजी माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभार्ते गावच्या हद्दीत पोलीस व वनविभागाच्या संयुक्त कारवाई दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी मंगेश लक्ष्मण कुर्मे वय वर्ष 45 रा. बोरवाडी निजामपूर व नईम अजीज शेख वय वर्ष 32 रा. बोरवाडी निजामपूर यांनी बिबट नखे विकत असताना सापळा रचून रांगेहाथ पकडले.इतर आरोपी दत्ता अनंत पवार वय वर्ष 22 रा. बेलवाडी कांदळे रोहा व मंगेश गिरीजा पवार वय वर्ष 35रा. गारबट वाडी रोहा यांना दि 22 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली त्याच्या विरोधात माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून न्यायलायत हजर केले असता त्यांना 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली.

वन्यजीवाची हत्या करून अवयवाची तस्करी करणारी टोळी माणगांव पोलिसांनी गजाआड केली बिबट नख्याची विक्री करीत असताना या टोळीतील चार आरोपीना पकडण्यात माणगांव वनविभाग व माणगांव पोलीसांना यश प्राप्त झाले त्याच्या विरोधात रा. गु. नं. डब्लू एफ एल 01/सण 2022/23 गुन्हेप्रकरणी पकडून त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2,9,39,49, व 51 चे उलंघन केल्यामुळे गुन्हा नोंदवून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

आरोपी कडून 10 बिबट नखे वनविभाग माणगांव व माणगांव पोलीस यांनी जप्त केली आहेत. वनशेत्रपाल अनिरुद्ध ढगे, वन्यपाल निजामपूर संजय चव्हाण,फिरते पथक वन क्षेत्रपाल विकास भाबरे व स्टाफ, सविता कदम वनरक्षक अशोक कोकडे, जर्मनसिग पाडावी,अक्षय मोरे,वन्यपाल ज्ञानदेव सुभेदार, वनशेत्र लेखापाल हरेंद्र पालकर वनरक्षक वैशाली भोर,चालक विवेक जाधव सहायक पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर, पो. शि. शाम शिंदे, मिलिंद खिरीट, दहिफळे, मिसाळ, पाटील यांनी कामगिरी पार पाडली पुढील तपास उपवनरक्षक रोहा विश्वजीत जाधव याच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास अनिरुद्ध ढगे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here