माणगांव एस एस निकम इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वाहतूक शाखा चे पोलीस हवालदार यांनी वाहतूकी बद्दल मौलाचे मार्गदर्शन दिले

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव:-सदर्भीय शासन परिपत्रक नियम क्र 5 (2) मधील तरतुदीनुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षितपणे करणे याकरिता समितीची प्रथम सभेचे आयोजन एस एस निकम स्कूल मध्ये करण्यात आले होते यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष असलेले मुख्याध्यापक, पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी शालेय बसचे व कत्राट धाराचा प्रतिनिधी मालक चालक व माणगांव वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दिपक शेरकर शिवराज बाडे यांनी आयोजीत केलेल्या विषयावर मार्गदर्शन केले.

बसमध्ये येणाऱ्या सर्वच्या विद्यार्थीची यादी संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर रक्तगट इत्यादी माहिती अद्यायवत असणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. बसची आवश्यक ती कागदपत्रे वैद्य असणे आवश्यक आहेत, बस वाहन चालवीण्याचा पाच वर्षाचा अनुभव असणे त्याच्याजवळ बसचालक बॅच असणे आवश्यक आहे.

बसचा चालक हा अग्रसिव्ह नसावा तो प्रामाणिक असावा बस चालू असताना पालकाचे चालकास मोबाईल वर बरेच फोन येत असतात त्यामुळे बस चालकाने मोबाईल वापरू नये असल्यास तो आपल्या सोबत असणारा मदतनीस याच्याकडे द्यावा बस मध्ये असणारे आशनक्षमता पेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे टाळावे पालक स्वतः विद्याथ्यांना शाळेत ने आण करतात त्या व्यतिरिक्त इतर खासगी सवगातील उदा. जीप, मेक्सिमो, मॅजिक, रिक्षा या सारख्या वाहणातून विद्यार्थी वाहतूक होणार नाही याची काळजी शाळेने घेणे आवश्यक आहे. जरं असं कोणी असं आढळून आल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार याची नोंद घ्यावी अशा पद्धतीने माणगांव वाहतूक ठाणे अंमलदार दिपक शेरकर, शिवराज बांडे यांनी एस एस निकम इंग्लिश स्कूल मध्ये शाळेतील विद्याथ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस ची माहिती घेतली त्याचप्रमाणे कोणीही जास्त वाहतूक करणार नाही याबद्दल मार्गदर्शन सूचना दिल्या यावेळी शालेय शिक्षक उभारे सर यांनी व मुख्याध्यापक यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here