अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? बघूया…

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील – पुणे

विजयकुमार गावित – नंदुरबार

गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा,

दादा भुसे – नाशिक

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे – सांगली

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार – हिंगोली

दीपक केसरकर – मुंबई शहर

अतुल सावे – जालना, बीड.

शंभूराजे देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने शिंदे – फडणवीस सरकारला घेरलं होतं.

पालकमंत्री नसल्याने अनेक कामं रखडल्याचाही आरोप करण्यात येत होता. मात्र, आता अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here