मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड येथे रासेयो स्थापना दिन संपन्न 

जितेंद्र तडस

हिवरखेड शहर प्रतिनिधी

नरखेड :- मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 24 सप्टेंबरम 2022 रासेयो स्थापना दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. प्रवीण कोहळे सर होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. प्रशांत देशमुख सर,श्री सुनील केने सर होते.सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व हार घालून कार्यक्रमाची सुरुवात कऱण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राधेश्याम ठाकरे रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकानी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व काय आहे,युवकांचा व्यक्तिमत्व विकास,चरित्र निर्मिती, राष्ट्रप्रेम,राष्टीय एकात्मता यामध्ये रासेयो चे योगदान आणि भूमिका या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .तसेच प्रमुख उपस्थित मध्ये प्रा डॉ. मंगला कडवे, प्रा.डॉ. निलेश हरणे,प्रा. डॉ. विजय घुबडे ,प्रा. सविता चव्हाण मॅडम प्रा.डॉ. मनोज पवार सर,प्रा.डॉ.प्रफुल धोके,प्रा.बालाजी आडे ,श्री रविंद्र कोल्हेकर, श्री विशाल ढोबळे ,श्री गजबीये उपस्तीत होते.

 सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्रा.राधेश्याम ठाकरे सर ,रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु.प्रतीक्षा माणेराव बीसडब्लू प्रथम सत्र ची विद्यार्थ्यांना हिने केले तर आभार प्रदर्शन क्रांतिक धुर्वे याने केले.प्रस्तुत कार्यक्रमला महाविद्यालयातील सर्व रासेयो स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्तीत होते तशेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here