रायगडावर शिवकाल अवतरला! शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या ६ वर्षापासून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचा द्वितीय राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्याच धरतीवर याही वर्षी शनिवारी दि.२४ सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर भर पावसात ही पारपरिक पद्धतीने शिवराज्यभिषेक सोहळा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी गर्जनाच्या जयघोषात किल्ले रायगडावर अपूर्व उत्सहात संभाजी ब्रिगेड च्या वतीने सोहळा साजरा करण्यात आला.

 

छत्रपती शिवाजी राजांनी राज्यभिषेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सनातनी लोकांना त्या राज्यभिषेकाळा विरोध केला तो विरोध डावलून शिवाजी राजांनी ६ जून १६७४ रोजी गागाभटच्या पौरोहित्याखाली राज्यभिषेक केला हा पहिला आणि वैदिक पद्धतीने केलेला राज्यभिषेक होता. त्यानंतर शिवरायांनी दुसरा राज्यभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त पद्धतीने स्त्री प्राधान्य घटस्थापना दिनी निश्चलपुरी गोसावी याच्या पौरोहित्याखाली केला.

 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत त्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा जगातल्या प्रत्येकाने घ्यावा इतका दैदीप्यमान असा इतिहास आहे. शिव छत्रपतीचा राज्यभिषेक म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्ण पान मानले जाते.ऐतिहाशिक अशा सोहळ्यासाठी विविध मान्यवर आणि मंत्री महोदयची उपस्थिती लाभणार होती परंतु काही कारणास्तव मंत्री महोदय उपस्थित राहू शकले नाही दरम्यान भर पावसात शिवछत्रपती च्या जय घोषात किल्ले रायडावर ३४९ वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा शिवप्रेमीच्या संख्येने मोठया उत्साही आणि आनंदी वातावरणात ढोलताशाच्या गजरात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here