ganeshotsav festival maharashtra

माणगांवमध्ये ढोल ताश्याच्या गजरात पाच दिवसाच्या गणरायाचे विसर्जन, बाप्पाला निरोप देताना बरसल्या पाऊस धारा…

ganeshotsav festival maharashtra

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-माणगांव तालुक्यात टाळ मृदूंगाच्या तसेच ढोल ताशाच्या गजरात सुरेख भजनाच्या साथीने मोठया मोठया संख्येने पाच दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करून निरोप देण्यात आले.गणेशाच्या आगमनाने माणगांवमध्ये पावसाने हजेरी लावली ती पाच दिवसाच्या विसर्जनापर्यत होती यां दरम्यान माणगांवमध्ये 83 मिली पावसाची नोंद झाली पाऊस फुलांच्या वर्षात पाच दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करताना छत्र्या रेनकोट घालून बाप्पाला विसर्जन स्थलापर्यंत सुरक्षित आणले.

रिकामं झालं घर.. रीता झाला मखर पुढल्यावर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर.. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर यां अशा जयघो्षात विघ्नहर्ताला आज निरोप आबालावृद्ध भाविकांनी श्रद्धेचा निरोप देण्यात आला.दांटला जरी कंट तरी निरोप देतो तुला हर्षाने माहित आहे देवा पुन्हा येणार तू वर्षाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर यां या जय घोषात बाप्पाला निरोप देण्यात आला माणगांव तालुक्यातील बामणोली ग्रामस्थांनी गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यत आजही भजनाची तसेच डोक्यावरून सर्वजण मिळून गणपती नेण्याची परपरा शभर वर्षा नंतरही कायम आहे.गौरी सणाच्या दिवशी एकत्र येऊन ज्याच्याकडे गौरी आहेत त्या ठिकाणी एकत्र पूजा करताना पाहायला मिळत होते.

यंदा पाच दिवसाच्या गणपती विसर्जनवेळी पावसामुळे फटक्याच्या आतिषबाजी करताना पाहायला मिळाले नाही परंतु गावच्या भजनमंडळानी विविध पोशाख परिधान केल्यामुले ते देखील उठून दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here