मी माझ्यासाठी नाहीतर देशासाठी जगणार हा संकल्प घ्यावा- प्राचार्य डॉ. गुरनुले

56
मी माझ्यासाठी नाहीतर देशासाठी जगणार हा संकल्प घ्यावा- प्राचार्य डॉ. गुरनुले

मी माझ्यासाठी नाहीतर देशासाठी जगणार हा संकल्प घ्यावा- प्राचार्य डॉ. गुरनुले

मी माझ्यासाठी नाहीतर देशासाठी जगणार हा संकल्प घ्यावा- प्राचार्य डॉ. गुरनुले

✍🏻गोपाल नाईक ✍🏻
नांदेड जिल्हा प्रतिनिधी….
मो.7499854591.

नांदेड : मी माझ्यासाठी नाहीतर देशासाठी जगणार ही भावना विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्याचे माध्यम म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना होय म्हणून अधिकांश विद्यार्थ्यानी या योजनेत सहभागी व्हावे ” असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ तुळशीदास गुरनुले यांनी केले. ते २५ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.राजेंद्र लोणे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. दिनेश व्हिजीगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात बळीराम पाटील मिशन चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड व सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार ”मेरी माटी, मेरा देश’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध गावातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील माती पवित्र कलशामध्ये जमा केली. हा कलश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे जमा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक कार्यक्रमाधिकारी लांडे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.