जिल्हा रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर व जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ थोरात यांचे उपस्थितीत आढावा बैठक

46

जिल्हा रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर व जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ थोरात यांचे उपस्थितीत आढावा बैठक

मीडिया वार्ता 

इगतपुरी  प्रतिनिधी

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे सुचनेवरून इगतपुरी, घोटी, त्रंबकेश्वर , हरसुल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय डाॅक्टरांचे उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आरोग्य विषयक अडचणी, तक्रारींबाबत संबंधितांना धारेवर धरत आमदार खोसकर यांनी खडे बोल सुनावले. स्वतःचे खाजगी रूग्नालय सांभाळुन शासकीय रूग्नालयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार डाॅक्टरांची गय केली जाणार नाही अशी तक्रार केली. या वेळी आरोग्य विषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली , त्रंबकेश्वर तालुक्यातील पश्चीमेकडील हरसुल भागातील रुग्णांना जिल्हा रुग्नालय गाठण्यासाठी तब्बल 150 कि.मी.चा खडतर प्रवास करावा लागतो अशावेळी अनेक रुग्नांचा उपचारा अभावी म्रुत्यु झाल्याच्या दुर्देवी घटना यापूर्वी घडल्या आहेत..अपघात सर्पदंश अशा रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी व उपचार सुरू होईपावेतो ३ ते ४ तास अवधी लागतो अशावेळी रूग्नाची परिस्थीती गंभीर होऊन रुग्न दगावण्याची परिस्थीती उद्भवते या साठी हरसुल येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार हिरामण खोसकर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असुन अधिवेशनातही या बाबत सुचना मांडलेली आहे परंतु लोकसंख्येचे अटीमुळे बाधा येत असल्याने किमान आदिवासी भागासाठी ही अट शिथिल करण्यात यावी या साठी शासनदरबारी मागणी करणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास हरसुल/ठाणापाडा व त्रंबकेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील रूग्नांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल असे आ.खोसकर यांनी सांगितले घोटी ग्रामीण रुग्णालयातील इमारत जुनी व जिर्ण झाल्याने पाणी गळती होत असुन घोटी येथे आमदार खोसकर यांचे प्रयत्नांतुन नविन इमारतीचे काम पुर्ण झालेले असल्याने गैरसोय दुर झाली असुन याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. तसेच रुग्नांचा वाढता आकडा बघता जुन्या इमारतीचे निर्लेखन करुन नविन इमारतीसाठी शासनाकडे निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे आ.खोसकर यांनी सांगितले .

ग्रामीण रुग्णालयातील व आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी/कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्नांची गैरसोय होत असुन या बाबत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमने बाबत सुचना केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र येथील इमारती शौचालय डागडुजी दुरुस्ती व नविन इमारत व साधन सामुग्रीसाठी पाठपुरावा सुरू असुन लवकरचं निधिची तरतुद करण्यात येणार असल्याचे सांगितले.