समर्थ विचार फाउंडेशन आयोजित गणेशसजावट स्पर्धेमध्ये अनिल पाटील प्रथम

116
समर्थ विचार फाउंडेशन आयोजित गणेशसजावट स्पर्धेमध्ये अनिल पाटील प्रथम

समर्थ विचार फाउंडेशन आयोजित गणेशसजावट स्पर्धेमध्ये अनिल पाटील प्रथम

समर्थ विचार फाउंडेशन आयोजित गणेशसजावट स्पर्धेमध्ये अनिल पाटील प्रथम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड च्या वतीने आयोजित स्व.आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मोठे शहापूर येथील अनिल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला.तर विपुल पाटील कनकगिरी द्वितीय व विष्णू मोकल हाशिवरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड च्या वतीने अलिबाग तालुकास्तरीय स्वर्गीय आद्य नाईक स्मृति गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केलं होते.या स्पर्धत टाकाऊ पासून टिकाऊ व
इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये 54 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मोठी शहापूर येथील अनिल पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यांनी केदारनाथ ,वाढती वृक्षतोड व ईरर्षालवाडी हा देखावा सादर केला होता .त्यांना ५५५५ रुपये, स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक विपुल पाटील कनकगिरी अश्मयुगातील गणेश यास ३३३३रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विष्णू मोकल हाशिवरे यांना प्रकल्पग्रस्त हा देखावा सादर केला होता.२२२२रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांक भाग्येश म्हात्रे केतकीचामळा यांचा स्वामी समर्थ देखाव्यास ११११रुपये, स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व पाचवा क्रमांक संजय म्हात्रे रांजणखर यांनी अलिबागकराचा रेल्वेचा स्वप्न यास ११११ रुपये स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र हे देखावे सादर केले होते. उत्तेजनार्थ स्वप्निल ठाकूर हाशीवरे गायमुख व मंदिर, हर्षिता सुनील पाटील मांडवखार कोळी वाड्यातील गणेश,
दीपक पाटीलभायमळा केदारनाथ तर विशेष पारितोषिक म्हणून योगेश पाटील खिडकी पंढरीची वारी, रवींद्र पाटील बहिरीचापाडा कुलाबा किल्ला निलेश कडवे सारळ निसर्ग चित्र यांची निवड करण्यात आली.
गणेश सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून जे जे ऑफ आर्ट स्कूलचे राजेश मेहत्रे सर ,लहू पाटील, रत्नाकर पाटील यांनी काम पाहिले.
विजयी स्पर्धकांना व सहभागी सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अमित नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ प्रमुख, पेढाबे ग्रामपंचायत सरपंच रसिका पाटील, प्रवीण पाटील, अमरनाथ पाटील, द वि धोदरे,संजय म्हात्रे अल्पेश पाटील,मयूर पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले यावेळी ग्रामस्थ मंडळ कनकगिरी,एकविरा मित्र मंडळ चे सर्व सदस्य व महिला मंडळ कनकगिरी व अमित नाईक मित्र मंडळ चे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीसमर्थ विचार फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष ॲड.रत्नाकर पाटील यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कांचन म्हात्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश गावंड,सुधीर कडवे ,यश पाटील,रोहन पाटील, नेहा पाटील, प्रथा पाटील विशाखा ठाकूर ,कौशल पाटील , विपुल पाटील, स्वप्निल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.