साईनगर मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या तारखा जाहीर.

18

साईनगर मित्रमंडळाच्या स्पर्धेच्या तारखा जाहीर.

भागवत जाधव
८८०५०२२५६५

अलिबाग: साईनगर मित्र मंडळ (प.) विद्यानगर यांच्या कमिटीने विविध स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुढील प्रमाणे तारखा जाहीर केल्या आहेत स्पर्धकांनी दिलेल्या वेळे अगोदर पंधरा मिनिट हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

शनिवार दिनांक २७/९/२०२५ सायंकाळी चार वाजता (४:००) स्लो सायकलींग गट पुढील प्रमाणे १)पहिला गट आहे पहिले ते चौथी २)दुसरा गट आहे पाचवी ते सातवी ३)तिसरा गट आहे आठवी ते दहावी आणि ४) चौथा खुला गट
रविवार दिनांक 2८/९/२०२५ चित्रकला स्पर्धा सकाळी नऊ (९:००)वाजता, विषय व गट पुढील प्रमाणे १) प्ले ग्रुप ज्युनियर / सीनियर केजी: पतंग रंगवणे
२) पहिली ते चौथी: पोहणारा बदक
३) पाचवी ते सातवी: पतंग उडवणारी मुले ४) आठवी ते दहावी: निसर्ग चित्र ५) खुला गट: मी पाहिलेले दृश्य

सायंकाळी चार (४:००) वाजता संगीत खुर्ची गट क्रमांक एक १) प्ले ग्रुप ज्युनियर/ सीनियर केजी.२) गट क्रमांक दोन पहिली ते चौथी मुले मुली एकत्र ३) गट क्रमांक तीन पाचवी ते सातवी मुले ४) गट क्रमांक चार पाचवी ते सातवी मुली ५) गट क्रमांक पाच आठवी ते दहावी मुले ६) गट क्रमांक सहा आठवी ते दहावी मुली ७) गट क्रमांक सात पुरुष खुला गट ८) गट क्रमांक आठ महिला खुलागट

सायंकाळी साडेसात (७:३०) वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा गट क्रमांक १) जुनियर/ सीनियर केजी २) गट क्रमांक दोन पहिली ते चौथी ३) गट क्रमांक तीन पाचवी ते सातवी ४) गट क्रमांक चार आठवी ते दहावी ५) गट क्रमांक पाच खुला गट पुरुष ६) गट क्रमांक सहा खुला गट महिला
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहभागी होण्याची विनंती करण्यात येत आहे स्पर्धेचा निकाल निर्णय मंडळाकडे राखीव राहील.