पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) व युथ फ्रंट द्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

16

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) व युथ फ्रंट द्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंजुषा सहारे
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रपिता ज्योतीराव फुले द्वारा स्थापित सत्यशोधक समाज स्थापना दिवसा निमित्त वक्तृत्व स्पर्धा पीपीआयडी द्वारा आयोजित करण्यात आली होती.
ज्यामध्ये ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्या मध्ये प्रथम पारीतोषिक वेदांत भोयर,द्वितीय पारीतोषिक कौस्तुब पातोडे तर तृतीय पारीतोषिक संकेत तंबाखे यांनी पटकावले. प्रोत्साहन पर १० बक्षिसे देण्यात आले त्यामध्ये कल्याणी शेंडे, करूना दुर्योधन, योगेश सिडाम,अक्षय चव्हाण,अनिकेत मेश्राम,बुलबुल ठाकूर,अभिश्री टेंभेकर ,शर्वरी पाटील,मुस्कान हिकरे ,करुणा दहाट या स्पर्धकांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाची अध्यक्षता राहुल मडामे (राज्य अध्यक्ष युथ फ्रंट) यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन संदीप जी चव्हाण (जिल्हा महासचिव पीपीआयडी) , प्रस्तावना अनिल जी चिमणकर (राज्य उपाध्यक्ष युथ फ्रंट) तर आभार सुमित जी कोटांगले (राज्य कोषाध्यक्ष युथ फ्रंट) यांनी मानले.
प्रथम पारितोषिक पक्षाच्या वतीने देण्यात आले. द्वितीय पारितोषिक संदीप जी रामटेके (वेरोन हेल्थकेअर ) तर तृतीय पारितोषिक नीरज मेश्राम (ग्रिन नर्सरी गार्डन) यांच्या वतीने देण्यात आले.