राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त ‘अवेअरनेस सेमिनार’

14

राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त ‘अवेअरनेस सेमिनार’

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, २४ सप्टेंबर
भद्रावती येथील श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे आयुर्वेद आणि निरोगी जीवनशैली या विषयावर जनजागृतीपर सेमिनारचे आयोजन केले होते.
प्रमुख वक्ते म्हणून सोमय्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शीतल कोलपाकवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील विविध उपचारपद्धती, संतुलित आहाराचे महत्त्व तसेच योग, प्राणायाम यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. आधुनिक जीवनशैलीतील ताणतणावावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपायांची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
प्रास्ताविक भद्रावती येथील श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलाजीचे प्राचार्य डॉ.
पद्मनाभ गाडगे यांनी केले. त्यांनी आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी या परंपरेतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या मंडळाचे अमित येरगुडे, अभिषेक येरगुडे आणि रोहिनिका येरगुडे यांचे सततचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली असून, आयुर्वेदाच्या ज्ञानाचा वापर करून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीकडे वाटचाल करण्याचा संदेश मिळाला.