डॉ. खत्री महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

14

डॉ. खत्री महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 सप्टेंबर
डॉ. खत्री महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सखी सावित्री समिती व आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त वतीने उजास या उपक्रमांतर्गत २० सप्टेंबरला मुलींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिरात रितु, सोनु, रवींद्र या तज्ज्ञ महिलांनी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींच्या मनातील भिती व गैरसमज दूर करत मनोबल वाढविले. प्राचार्य डॉ. काकडे यांनी शिबिराचे आयोजन करणाऱ्या समितीचे व उपस्थित मार्गदर्शकांचे आभार मानून मुलींच्या आरोग्य जागृतीसाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. – संचालन सुवर्णा राऊत यांनी, तर आभार सादलवार यांनी मानले.