Home latest News पालघर तालुक्यात कातकरी समाजाची भव्य एकजूट! नाग्या महादू कातकरी स्मृती दिन व...
पालघर तालुक्यात कातकरी समाजाची भव्य एकजूट!
नाग्या महादू कातकरी स्मृती दिन व बलिदान दिन उत्साहात साजरा
“समाजाच्या ऐक्यासाठी झटू – बलिदान स्मरणात ठेवू” ठाम निर्धार
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
7798185755
पालघर, दि. 25 सप्टेंबर : पालघर तालुक्यातील सर्व कातकरी समाजाने एकत्र येऊन वीर नाग्या महादू कातकरी स्मृती दिन व बलिदान दिन मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या भावनेने साजरा केला. सुर झलकारी कातकरी एकता महासंघ तर्फे आयोजित या कार्यक्रमाला तब्बल एक हजार ते बाराशे बांधवांनी हजेरी लावली. समाजाच्या ऐतिहासिक एकजुटीमुळे हा सोहळा विशेष ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात समाजातील वीरांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक रमेश सावरा, महाराष्ट्र राज्य सचिव शांताराम ठेमका, राज्य कोषाध्यक्ष डॉ. रमेश भोये तसेच कार्याध्यक्ष सिलीन लहांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हाध्यक्ष विजय शिसव आणि जिल्हा सचिव शिवराम मुकणे यांनी समाजाच्या संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित व पालघर तालुका अध्यक्ष सुनिल पवार यांनी कार्यकर्त्यांना एकतेसाठी झटण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष रतिलाल आर. डी., डहाणू तालुका सचिव दिलीप पवार, राज्य सदस्य मनोज जाधव, डहाणू तालुका उपाध्यक्ष सुरेश भोये व संतोष घाटाळ, तालुका सहसचिव अनिस मिसाळ हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय उपाध्यक्ष अनंता म्हशे, सचिव संतोष भडांगे, सदू वाघ, पांडुरंग गावित व नितीन डगला यांनी संघटनेच्या भविष्यातील योजना मांडल्या.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी वातावरण लाभले. या सोहळ्यात कातकरी समाजाच्या बलिदानाचा गौरव करण्यात आला आणि भावी पिढीने संघटित होऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प घेतला.
संस्थापक रमेश सावरा, राज्य सचिव शांताराम ठेमका, डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित यांसह मान्यवरांनी समाजाच्या आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकत जनतेला समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
उपस्थित बांधवांनी ठाम निर्धार व्यक्त केला :
“समाजाच्या ऐक्यासाठी झटू बलिदान सदैव स्मरणात ठेवू!”