उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा
मीडिया वार्ता न्यूज वृत्तसेवा.
बीड :- गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा केला. या अतिवृष्टीने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मदतीची मोठी घोषणा केली.
संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन ही त्यांनी यावेळी दिलं.ज्यांच्या घरात पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ पाच हजार रुपये रोख आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, असे अजित पवार म्हणाले.
हवामान खात्याने पुढील काळातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.