राज्यभर स्वच्छता अभियान २०२५ सुरू

24

राज्यभर स्वच्छता अभियान २०२५ सुरू

मिडियावार्ता न्यूज वृत्तसेवा

पनवेल :- नगरविकास विभागाने १७ सप्टेंबरपासून राज्यात ‘स्वच्छता हीच सेवा अभियान २०२५’ सुरू केले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज मेट्रो सिनेमा ते ईएनटी हॉस्पिटल मार्गावर स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: हाती झाडू घेऊन सहभाग घेतला.

या उपक्रमांतर्गत आज राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये ‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक सक’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राज्यातील २०हजार ४४६ अस्वच्छ ठिकाणी साफसफाईची कामे हाती घेण्यात आली. अस्वच्छ जागांचे स्वच्छ आणि सुंदर जागेत रूपांतर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे वचन दिले.

गांधी जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरात ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या उपक्रमाच्या संकल्पनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छता सुरक्षा शिबिरे, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कारांचाही समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभाग २ चे मुख्य सचिव गोविंदराज, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना सहप्रवक्ते राजू वाघमारे, शालेय विद्यार्थी व मुंबई महानगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.