पोहेगाव येथे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार सप्ताह साजरा.

92

पोहेगाव येथे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार सप्ताह साजरा.

महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत पोषण आहार कार्यक्रम.

दैनिक मीडिया वार्ता अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037.

दि.25.9.2025. गुरुवार रोजी
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील
पोहेगाव या ठिकाणी आज महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत पोहेगाव खुर्द.
गावठाण या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी पोहेगाव पंचक्रोशीतील सर्व अंगणवाडी सेविका, व मदतनीस ताई, सुपरवायझर
श्रीमती.लता भेंडेकर ,
जिल्हा परिषद शाळा पोहेगाव मुली. मुख्याध्यापक
श्रीमती.डोंगरे मॅडम,ग्रामसेवक, मा.टिळेकर.भाऊसाहेब आरोग्य विभागातील श्रीमती.पवार सिस्टर,आशा सेविका तसेच परिसरातील लाभार्थी व पालक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोहेगाव ग्रामपंचायत, सरपंच यांची होती.

मा.श्री.अमोल भाऊसाहेब पा. औताडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले, या कार्यक्रमांमध्ये कडधान्य, फळे, वेगवेगळे पदार्थ ,वेगवेगळ्या पालेभाज्या , गरोदर मातेचे दररोजच्या जेवनातील आहाराच्या प्रमाणाचे ताट यांचे स्टॉल व्यवस्थित रित्या मांडणी करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे तसेच पालक यांनी स्टॉलचा परिपूर्ण आनंद घेतला .

अंगणवाडी सेविका
श्री. मनीषा अविनाश औताडे. यांनी गरोदर मातेने गर्भावस्था मध्ये कोणत्या कृती कराव्यात, गर्भावर कशाप्रकारे संस्कार करावेत, गरोदर मातेने स्वतःची काळजी कशी घ्यावी,
सहा महिन्याच्या बाळाला वरचा आहार केव्हा सुरू करावा, आहार सुरू करतेवेळी आहाराची घनता कशी असावी आहाराचे प्रमाण किती असायला हवे, गरोदर मातेपासून ते बालक दोन वर्षाचे होईपर्यंत आहारापासून ते लसीकरणापर्यंत मातेची व बालकाची काळजी कशाप्रकारे घ्यावी याचे मार्गदर्शन केले. पोहेगाव आरोग्य विभाग अंतर्गत श्रीमती .पवार मॅडम यांनी गरोदर मातेने गर्भावस्थेमध्ये आहार कसा घ्यावा,व लसीकरण याबाबत पालकांना मार्गदर्शन केले .

पोहेगाव ग्रामपंचायत सरपंच
मा.श्री.अमोल भाऊसाहेब पा. औताडे यांनी उपस्थित पालकांना आहार आरोग्य बाबत मार्गदर्शन केले. पोहेगाव पंचक्रोशी मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूप मेहनतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यामध्ये उपस्थित अंगणवाडी सेविका श्रीमती.शारदा गरुड, सुमन औताडे, रेखा भालेराव, अनिता गांगुर्डे, उज्वला भालेराव, नंदा औताडे, सीमा मोरे, सविता शेजवळ, मंगल देशमुख,वर्षा निकम, मनीषा औताडे, तसेच अंगणवाडी मदतनीस श्रीमती. मयुरी शेजवळ, सुनंदा साळुंखे, संगीता शेजवळ, सुवर्णा रोहमारे, संगीता औताडे, मीना औताडे, आशा वाके, वर्षा खंडीझोड, ज्योती डांगे, पूजा भालेराव.

अंगणवाडी सेविका श्रीमती. मनीषा अविनाश औताडे यांनी सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे पोहेगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पंचक्रोशोतील सर्व पालक तसेच महिला यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
🔹🔹🔹