पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

21

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :-भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा कार्यालयात थोर विचारवंत, तत्त्वज्ञ व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद माजीअध्यक्ष अँड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सभापती तसेचभाजप रायगड दक्षिण महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील, ज्येष्ठ नेते जगदीश पाटील, अलिबाग दक्षिण विभाग तालुकाप्रमुख अशोक वारगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना वक्त्यांनी उपाध्यायजींच्या कार्याचा व विचारांचा वेध घेतला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा हा त्यांचा ‘एकात्म मानववाद’ाचा विचार आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

भाजप कार्यकर्त्यांनी या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक बांधिलकी जपत संघटन अधिक सक्षम करण्याचा संकल्प केला.