बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांचे अभिवादन

15

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांचे अभिवादन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 सप्टेंबर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिष्य, गरीब-शोषित-वंचित घटकांचे खरे रक्षणकर्ते, थोर कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते न्याय, समता, स्वातंर्त्य आणि बंधुता या घटनात्मक तत्त्वांचे पुरस्कर्ते होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारसरणीचे ते खरे शिलेदार होते. त्यांनी लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला. आज आपण त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे स्मरण करतो आहोत. राजाभाऊंनी दाखवून दिलेला मार्ग म्हणजे घटनात्मक मार्ग. त्यांनी कधीही हिंसा, अराजकता किंवा जातीवादाला खतपाणी घातले नाही. त्यांनी घटनात्मक तत्त्वांवर आधारलेली सामाजिक चळवळ उभी केली. त्यामुळे त्यांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी ठरले असे ते म्हणाले.