राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द येथे पालक सभा

17

राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द येथे पालक सभा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर/ पोंभुर्णा
राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द द्वारा संचालित राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द‌‌‌ येथे शनिवार, २० सप्टेंबर ला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप मॅकलवार तर प्रमुख अतिथी म्हणून पालक – शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रमोद देऊरमले उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, मालार्पन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
नंतर पालक – शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
अध्यक्ष – वसंत हरबाजी देऊरमले आणि उपाध्यक्ष – अर्चना लोमेश निमसरकार आणि सचिव म्हणून प्राचार्य दिलीप मॕकलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आदि समितीचे गठन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र टिकले, संचालन संजय नागुलवार तर आभार प्रा.विनोद कुनघाडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.