सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा

39

सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 सप्टेंबर
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्य आयुर्वेदाच्या जनजागृती साठी विविध उपक्रम घेण्यात आले, त्यामध्ये जनजागृतीसाठी रॅली,मेळावा काढण्यात आला. आयुर्वेदिक उपचार तसेच आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व,आहार ,योग,नाटक स्वरूपात विद्यार्थांनी आयुर्वेदिक दिनचर्या सादर केले.
सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर शीतल कोलपाकवार यांनी आयुर्वेदा फॉर पीपल प्लॅनेट बद्दल मार्गदशन केले, आयुर्वेदाला वैज्ञानिक व समग्र औषध प्रणाली म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे. याचा उद्देश आयुर्वेदाच्या सामर्थ्याबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल जनजागृती करणे, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व निरोगीपणाला चालना देणे आहे.
सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुमठाना भद्रावतीचे अध्यक्ष पी.एस आंबटकर अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी सदैव प्रोत्साहित करीत असतात.
तसेच या कार्यक्रमात मेकरून स्टुडन्ट अकॅडमी च्या प्राचार्य राजदा सिद्धकी, डॉ.राजेश गटटूलवर, डॉ.प्रज्ञा, डॉ.स्नेहा वाकडे तसेच रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.