ऐतिहासिक वास्तू थिबा पॅलेस, थिबा राजाचे प्रार्थना स्थळ “बुध्द विहार” रत्नागिरी शहरात दुर्लक्षित…

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं. ९८६९८६०५३०
रत्नागिरी:- इंग्रजांचे काळात म्यानमारच्या म्हणजेच ब्रम्हदेशाच्या राजाला इंग्रजानी अटक करून रत्नागिरी शहरात आणून प्रथमतः आजचा डि.एस.पी.बंगला येथे नजरकैदेत ठेवले होते.थिबा राजा हा धर्माने बौध्द असलेल्याने इंग्रजांनी थिबा राजाला डि.एस.पी.बंगल्या शेजारीच असलेल्या जागेत बुध्द विहार बांधून देवून थिबा राजाला प्रार्थना करणेस धार्मिक मुभा दिली होती.त्यानंतर इंग्रजांनी थिबा राजाला मोठा इतिहासीक राजवाडा बांधून दिला.त्याचप्रमाने थिबा राजाचे टेहळणी स्थळ म्हणून थिबा पाईट विकसीत व जतन शासन/प्रशासन करत आहे.परंतु इतिहासीक थिबा राजाच्या “बुध्द विहाराकडे” जाणून-बुजून शासन/प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने* रत्नागिरी शहर आणि परिसरातील बौध्द बांधवांनी बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती,१४एप्रिल या दिवसी जमा होवून बुध्द वंदना सुरू केली असताना. बौध्द बांधवांनी आप आपल्या धार्मिक संस्थाचे माध्यमातून शासन/ प्रशासकडे हे “इतिहासीक बुध्द विहार” विकसित व सुशोभित करणे व ताब्यात द्यावे म्हणून अनेक दिवसा पासून मागणी करत आहेत. परंतु शासन/प्रशासन दखल घेत नसल्याने बौद्ध समाजात नाराजी पसरली जात आहे.
मधल्या काळात म्यानमारच्या शासकीय व थिबा राजाच्या नातेवाईकांच्या दौऱ्यात शासकीय अधिकारात शासनाने कार्यक्रमाचे आयोजन ही याच ठिकाणी करून पार पाडले असून हे इतिहासीक *बौद्ध स्थळ* असलेल्याचे शासनाने ही दाखवून दिले असतानाही हे इतिहासीक स्थळ बौद्ध बांधवांचे ताब्यात देण्यास शासन /प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.