मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा उद्यापासून होणार बंद

70
मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा उद्यापासून होणार बंद

मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा उद्यापासून होणार बंद

मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा उद्यापासून होणार बंद

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

कोकण :-कोकणवासी आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली
मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून २६ ऑक्टोबर बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे.मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आला. या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मध्यंतरी अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टिकेच लक्ष बनली होती. तीन वर्षांपूर्वी मुंबई ते चीपी चीपी ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

२६ ऑक्टोबरपासून मुंबई ते चिपी ही विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे कोकणवासीयांचे विमानातून आरामात आपले गाव गाठण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहणार आहे.
९ ऑक्टोबर २०२१ पासून सिंधुदुर्गातील विमानतळावरून ‘चिपी’ व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती. आता पर्यटन हंगामाला प्रारंभ झालेला असतानाच अचानक सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.ही सेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू केली होती. ही मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची २६ तारखेपासूनची तिकीट विक्री बंद आहे.दरम्यान याच चीपी विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीची पुणे – सिंधुदुर्ग – हैदराबाद आणि बेंगलोर ची सेवा सुरू आहे.