माणगांव तालुक्यातील कातेवाडी आदिवासी येथील एक विवाहित महिला घरातून गेली ती परंतलीच नाही…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-मिळालेल्या पोलीस सूत्रांकडून माहितीनुसार दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास माणगांव तालुक्यातील खरबाची वाडी आदिवासी वाडी येथे राहत असलेली सौ. रुचिता सुनिल जाधव वय वर्ष २२ तिचा पती घरी झोपला असताना ती आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता गेली ती अद्याप परंतली नाही तिचा शोध घेतला असता सापडली नसल्याने सदर फिर्यादी मंगल लहू जगताप वय वर्ष ३८ राहणार कातेवाडी आदिवासीवाडी यांनी माणगांव पोलीस ठाण्यात मिसिंग अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
मिसिंग असलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे नाव रुचिता सुनिल जाधव वय वर्ष २२ रंग गोरा चेहरा उबट, उंची पाच फूट अंगाने सडपातळ, केस काळे व लांब,पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस पायात सफेद रंगाचं लेडीच बूट गळ्यात दोन छोटे मंगळसूत्र सोन्याचा पान असून कोणाच्या निर्दनास आल्यास पोलीस पोलीस ठाण्यात संपर्क साधावा अधिक तपास माणगांव पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे साहेब यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार तुणतुने सह फौंजदार निमकर हे करीत आहेत.