हिंगनघाट येथील 34 लाख रुपयांची चोरी करणारे आरोपी अटक.

पोलिस अधिक्षक प्रंशात होळकर न केली जबरदस्त कारवाई

मुकेश चौधरी प्रतिनिधी

हिंगनघाट :- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी करत 34 लाख रुपयांचा ऐवज लांबवला होता. शहरातील सर्वात मोठी घरफोडी झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी जातीने लक्ष घालून तपास केला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
हिंगणघाट येथील कोठारी बिल्डींगमध्ये दुपारच्या सुमारास चोरट्यांनी शहरातील प्रसिद्ध जिंनीग व्यावसायिक हरीश गोविंद हुरकट यांच्या घरी चोरटयांनी चोरी केली. 34 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये सोने, चांदी, हिरे असा ऐवज होता. मोठी चोरी असल्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले होते. शेजारी राहणाऱया नागरिकांनी दोन चोरट्यांना पाहिले आहे. पोलिस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल झाले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर जातीने घटनास्थळी हजर होते. स्थानिक पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांनी सुद्धा पाहणी केली होती. यासंबधी हिंगणघाट पोलिसांनी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून 110 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केलेल्या कारवाईचे परिसरात कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here