अस्थाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात,सात दिवस विद्यापीठ आवारात साखळी धरणे आंदोलन.

1200 अस्थाई कर्मच्यांरी आरोग्य विमा, वेतनवाढ, नैमित्तिक रजा, निर्वाह निधी या मूलभूत सुविधांन पासून अस्थाई कर्मचारी वंचित आहेच परंतु साध अधिकृत ओळखपत्र ही कर्मचाऱ्यांना देण्यास विद्यापीठ निष्क्रिय ठरलेल आहे. यासाठी संघटनेला साखळी धरणे आंदोलनाचा पविञा घ्याला लागला.

 

मुंबई:- अस्थाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात नियमित पञव्यवहारा करूनही मुंबई विद्यापीठ प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुंबई विद्यापीठातील 1200 अस्थाई कर्मच्यांरी सलग सात दिवस विद्यापीठ आवारात साखळी धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.
23 नोव्हेंबर पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलना मागील संघटनेचा हाच प्रामाणिक उद्देश आहे की, स्थाई कर्मचाऱ्यांप्रमाणे अस्थाई कर्मचाऱ्यांनाही विविध सवलती मिळाव्यात यासाठी गेले अनेक वर्षे विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.


आरोग्य विमा, वेतनवाढ, नैमित्तिक रजा, निर्वाह निधी या मूलभूत सुविधांन पासून अस्थाई कर्मचारी वंचित आहेच परंतु साध अधिकृत ओळखपत्र ही कर्मचाऱ्यांना देण्यास विद्यापीठ निष्क्रिय ठरलेल आहे. यासाठी संघटनेला साखळी धरणे आंदोलनाचा पविञा घ्याला लागला.
जागतिक महामारी कोरोणाचा प्रार्दुभाव लक्षात घेता. गर्दी टाळण्यासाठी दर दिवशी दुपारी १ते२ या वेळेत आपले कामकाज संभाळून नियोजित विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी होतील, सदर आंदोलन मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते मिलिंद तुळसकर यांच्या नेतृत्वाखालील सुरू आहे आणि आमचा त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here