ब्रह्मपुरी येथे दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी

48

ब्रह्मपुरी येथे दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी

ब्रह्मपुरी येथे दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी
ब्रह्मपुरी येथे दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी

प्रतिनिधी:-राहुल भोयर , ब्रम्हपुरी मो. 9421815114

आज दिनांक 24 नोव्हेंबर 2021 ला ब्रह्मपुरी येथील टिळक नगर मधील एक नामवंत नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तींच्या घरी सकाळी साडे दहा अकरा वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या एका ट्रॅक्टरद्वारे रेती उपसा करण्यात आली मात्र ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये कोणत्याही रेती घाटाला परवानगी नसताना हि रेती येतो कुठून याबाबत शंका उपस्थित होतोय.

ब्रह्मपुरी येथील तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना विविध पक्षांच्या वतीने तसेच संघटनांच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यातील वेगवेगळ्या रेती घाटावरून होत असलेल्या अवैध रेती तस्करीवर आळा बसावा या उदांत हेतूने माननीय तहसीलदार व माननीय उपविभागीय अधिकारी यांना अवैध रेती तस्करांवर कार्यवाही करण्याबाबत निवेदने सादर करण्यात आलेत.

यावर कार्यवाही म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना व तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांना अशा प्रकारच्या होत असलेल्या अवैध रेती तस्करीवर कार्यवाही करण्याचे आदेश/फर्मान जारी केले.
मात्र हे आदेश फक्त कागदावर दाखवण्याकरिताच होते का अशी शंका ब्रह्मपुरी वासियांना वाटत आहे.
एवढे करूनही जर या रेती तस्करांवर कार्यवाही करण्यात येत नसेल तर यात कोणाची मिलीभगत आहे कोणाचे खिसे गरम होतो. हा चर्चेचा विषय आहे.

गावागावात तलाठी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि एवढे असून सुद्धा जर दिवसा ढवळ्या अशा अवैध धंदेवाल्यांची हे अधिकारी कर्मचारी पाठराखण करत असतील तर यांच्याकडून सामान्य जनतेनी काय अपेक्षा करावी.
विषय खूप प्रश्नांकित आहे?