जालना: जावयाने केले सासूवर सपासप चाकूने वार, मग डोक्यात फरशी घालून दोन चिमुकल्या समोर केली हत्या.

✒मिडिया वार्ता न्यूज ✒
जालनाः- जालना येथुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी भांडण झाल्यानंतर माहेरी गेली त्यात अनेक महिने झाले तरी ती माहेरी नांदायला यायला तयार होत नाही. याचा राग आल्यानं जावयानं थेट सासूचाच निर्घृण हत्या केली त्यामूळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे दुर्दैवी हत्याकांड घडताना या आरोपीचे दोन मुलं हे घटनास्थळी उपस्थीत होते. दोन चिमुकल्यांसमोरच या इसमाने सासूवर चाकूचे वार केले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव सखुबाई भीमसिंग काळे असे आहे. तर विजय किशन धिल्लोड असे आरोपीचे नाव आहे. जालना पोलिसात पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली.
जालना शहरातील संभाजीनगर परिसरात राहणा-या सखुबाई भीमसिंग काळे याची जावई विजय किशन धिल्लोड याने चाकूने वार करुन, मग डोक्यात फरशी घालून आपल्याच दोन चिमुकल्या समोर केली हत्या. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. औरंगाबाद येथील भीमनगर येथे राहणाऱ्या विजय किसन धिल्लोड याची पत्नी जालना येथे माहेर तिच्या आईकडे गेल्या काही वर्षांपासून राहते. घरात पती-पत्नी दरम्यान वाद होत असल्याने सासूने मुलगी ज्योती विजय धिल्लोड हिला नांदायला पाठवण्यास नकार दिला होता. हाच राग मनात धरून विजय धिल्लोड याने सोमवारी रात्री सासूच्या डोक्यात चाकूने वार केले. एवढेच नव्हे तर फरशी मारून त्यांना मारहाणही केली. यातच त्यांची हत्या झाली.
सासूची एवढी क्रूर हत्या केल्यानंतर सदर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी भागात शोध घेतला. अखेर शहरातील गांधी चमन भागात आरोपी झोपलेला दिसला. पोलिसांनी त्याला तत्काळ उचलले. दरम्यान गंभीर सखुबाई काळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.