अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पाचही तालुक्यात स्वबळावर नगर पंचायत निवडणूक लढवणार, रियाज शेख, जिल्हा प्रमुख यांचे आव्हान

61

अमोल एन रामटेके अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी,9405855335

जिल्हा गडचिरोली: अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुके नगर पंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिनांक २४/११/२०२१ रोजी संध्याकाळी अचानक आचारसंहिता जाहिर झाले सोबतच निवडणुकीच्या नामनिर्देश फार्म भरण्यापासून तर मत मोजणी पर्यंतचे सर्व कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी याचे कडून जाहिर झाल्याने शिवसेना अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिकांनी स्वागत केले. शिवसेना पक्ष प्रमुख मा.ना. उध्दव ठाकरे साहेब, राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या कुशल नेतृत्व आणि. मा.अनिल देसाई साहेब, शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य तथा खासदार, मा. ना. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली , मा. गजानन किर्तीकर साहेब, विदर्भ संपर्क प्रमुख, खासदार, मा. प्रकाश वाघ साहेब, मा. किशोर पोतदार,गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, मा. विलास कोडापे, यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायतीचे निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार. असे शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी सांगितले. तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्त्यांनी कमर कसली आहे. *विशेष म्हणजे नगर पंचायत निवडणूक पहिल्यांदा अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात शिवसेना नगर पंचायत निवडणूक लढवीत आहे*. नक्कीच यावेळी शिवसेना भगवा फडकवणार असेही रियाज शेख यांनी जाहिर आवाहन केले. यावेळी निवडणूक शिवसेने साठी सोपे जाणार कारण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व नगर पंचायतिला भरपूर निधी प्राप्त करून दिली आणि आजही नगर पंचायत मध्ये विकास कामे सुरू आहेत. नगर पंचायत निवडणुकीत मतदार बंधूंनी नक्कीच अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शिवसेना पक्षाला आशिर्वाद देणार व जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना निवडणुकीत बाजी मारणार एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना एल्गार पुकारला.