विदुत लाईट लावण्याबाबत नगरपंचायतला संभाजी ब्रिगेडचे निवेदन.

✒कारंजा घाडगे प्रतिनिधी✒
कारंजा घाडगे :- कारंजा शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मधील प्रज्वल पाटील यांच्या घराजवळ मागील एक वर्षा पासून नवीन पोल लागला आहे पण अजून ही त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आला नाही. वॉर्ड क्रमांक 17 मधील नागरिकांना लाईट नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. स्ट्रीट लाईट या परिसरात नसल्यामुळे सर्वीकडे अंधाराच सम्राज पसरलेले दिसून येते, त्यामूळे या परीसरातील नागरिकांनी संभाजी ब्रिगेडचे नेते पियुष रेवतकर यांना याबाबत माहिती दिली.
काल पियुष रेवतकर यांनी पुढाकार घेऊन काल नगरपंचायत मुख्याधिकारी यांना स्ट्रीट लाईट लावण्याबाबतचे निवेदन पत्र दिले आणि स्ट्रीट लाईट लवकरात लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देता वेळी केला. आम्ही तत्काळ लाईट लावून देऊ असे नगरपंचायतनी संगितले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष पियुष रेवतकर आणि सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.