“क्रुपया बिजेपी, जेजेपी आरएसएस के लोग इस शादी से दुर रहे”; लग्नपत्रीकेतील राजकीय विरोध.

✒मिडिया वार्ता न्यूज टिम✒
हरियाणा:- राज्यातून एक राजकारणात खळबळ उडवणारी लग्न पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या राजकारणातील भूमिका मांडण्यासाठी विरोध दर्शवण्यासाठी लोक अनेक प्रकारे विरोध दर्शवतात. पण चक्क एका व्यक्तीनं आपला राजकीय विरोध दाखवण्यासाठी एक खळबळ उडवुन देणारी गोष्ट केली असून या व्यक्तीनं चक्क आपल्या मुलीच्या लग्न समारंभासाठी छापलेल्या लग्नपत्रिकेचाच यासाठी वापर केला आहे. या विरोधाचं कारण ठरलंय वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे!
हरयाणा राज्यातील विश्ववीर जाट महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच जय जवान जय किसाना मजदूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेश धनखर यांनी केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांना अजब पद्धतीनं विरोध दर्शवला आहे. भारतीय जनता पार्टी, जननायक जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, आपल्या मुलीच्या विवाह समारंभापासून बिजेपी, जेजेपी, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी दूर रहावं. हा समारंभ 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडणार आहे. या संदेशाची लग्नपत्रिका सोशल मीडियात व्हायरल होताच सर्वीकडे खळबळ माजली आहे.
हरयाणा राज्यात सध्या बिजेपी – जेजेपी आघाडीचं सरकार आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून हरयाणातील शेतकरी केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत यासाठी आंदोलन करत आहेत. यामुळं त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी या आंदोलकांचा पोलिसांसोबत वादही होत आहेत. या पार्श्वभूमीवर धनखर यांनी बीजेपी, जेजेपी, आरएसएसला कडवा विरोध दर्शवला आहे.