डॉ. श्याम गावंडे आयुष अवॉर्डने सन्मानित.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348📲
नागपुर:- राष्ट्रीय निसर्गोपचार दिन (18 नोव्हेंबर) च्या अनुसंघाने नागपूर येथे कविवर्य सुरेश भट ऑडीटोरियम येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन संबोधित केलेले आयोजित कार्यक्रमात श्री. डॉ. श्याम गावंडे यांची त्यांनी केलेल्या योग आणि निसर्गोपचार क्षेत्रातील सेवा व तसेच अंध विद्यालय चिखलदरा, व्यसन मुक्ती केंद्र वर्धा येथे कोरोनाबाबत योगाचे महत्त्व, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र श्रीलंका तसेच विविध राज्याच्या वृत्तपत्रांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविले होते.
योग आणि निसर्गोपचार क्षेत्रातील कार्य, सामाजिक जनजागृतीच्या प्रामाणीक कार्याचे फलित म्हणून आयुष आंतरराष्ट्रीय मेडिसिन असोसिएशन (AI MA) नागपूर
व तसेच भारत सरकारचे MSME चे मंत्रालय ऑर्गनायझेशन द्वारे श्री. डॉ. श्याम गावंडे यांना आयुष अवॉर्ड्स देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराजा ऑफ नागपूर श्री महंत मुधोजी भोसले , आयुष इंटरनॅशनल मेडिसिनचे सर्व पदाधिकारी व तसेच इतर मान्यवर व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री. डॉ. श्याम गावंडे यांना आयुष अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आल्याने सर्वीकडुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.