शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये तातडीने भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध कराव्या अशी ‘बांधिलकी संघटनेची’ मागणी 

47

शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये तातडीने भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध कराव्या अशी ‘बांधिलकी संघटनेची’ मागणी                                                      

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो.नं. ९८६९८६०५३०           

मुंबई- संविधान दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये भारतीय संविधानच उपलब्ध नाही. (मुंबई दिनांक : २५/११/२०२२) २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे असा केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचा मानस आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जागरूकता मोहीम राबविण्याबाबतचे शासन परिपत्रक देखील काल दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आले आहे. शासनाने सर्व विभागांना संविधान दिन साजरा करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.

असे असताना महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये मात्र भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध नाहीत याकडे शासनकर्त्यांचे लक्ष नसणे हि अत्यंत निंदनीय अशी बाब आहे. संविधान विकत घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे निराशा होत आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

तरी या बाबीचा गांभीर्याने विचार करून शासनाच्या शासकीय मुद्रणालयामध्ये तातडीने भारतीय संविधानाच्या प्रती उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बांधिलकीचे प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे, रुपेश पुरळकर, मूलनिवासी माला, मनोज सागरे, तुषार कांबळे, आर.आर.कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.