भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य वतीने भाजपच्या संयोजकपदी शर्मिला सत्वे यांची नियुक्ती

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :- भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपच्या संयोजकपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शर्मिला शिवराम सत्वे यांची नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचे नियुक्ती पत्र नुकतेच भाजपच्या प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,गणेशकाका जगताप,युवानेते विक्रांत पाटील यांच्याहस्ते त्यांना देण्यात आले.शर्मिला सत्वे यांची भाजपच्या संयोजकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आ.प्रवीण दरेकर,आ.प्रशांत ठाकूर,भाजप किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,महिला मोर्चा पदाधिकारी व सदस्य यांच्यसह अनेक कार्यकर्त्यांनी व मित्रपरिवार यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

           शर्मिला सत्वे या भाजपच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्या म्हणून सर्वत्र ओळखल्या जातात.त्यांनी माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष,सरचिटणीस,जिल्हा माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षा तसेच भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून चांगले काम केले आहे.भाजप सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड व तळमळ राहिली आहे. गोरगरीब जनतेला विविध शासकीय,निमशासकीय कामांत ते सतत मदत करीत असतात.त्यांच्या या सर्व कामांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत त्यांना बढती देत त्यांची भाजपच्या संयोजकपदी नियुक्ती केली आहे.आपल्या नियुक्तीबद्दल प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना शर्मिला सत्वे म्हणाल्या कि,पक्षश्रेष्टींचा विश्वास सार्थ ठरवून भाजप पक्ष वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.भाजप सरकारच्या विविध योजनांचा लाभ यापुढेही आपण लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षसंघटना मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहील असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here