श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन. तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा.

श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन.
तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा.

श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन. तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव:पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांचे शिक्षकांना व पालकांना आवाहन
म्हसळा प्रतिनिधी
श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नामवंतांना सर्वोत्तम गुणगौरव पुरस्काराने सन्मानित,गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप, तालुक्यातील ३८ रा.जि.प मराठी शाळांना व अंगणवाडी यांना शैक्षणिक वस्तू व खाऊ वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग मुक्त अभियान राबवुन तालुक्यातील दहा टी.बी.रुग्णांना सहा महिने पुरेल इतके सकस आहार वाटप असे अनेक उपक्रम राबविले व या पुढे देखील राबविण्यात येणार आहेत, म्हसळा तालुक्यातील प्रथमच संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे ,या मध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे शिक्षकांना व पालकांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आवाहन केले आहे व आमचे एकच उद्देश आहे की तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे व स्पर्धा परीक्षा कशा प्रकारे देण्यात येतात व उद्याचा प्रशासकीय अधिकारी बनायचे असेल तर स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे आहे असे देखील लाड यांनी शिक्षण परिषदेच्या वेळी बोलताना सांगितले . या स्पर्धा परीक्षा बाबतीत म्हसळा तालुक्यातील शिक्षण परिषदेच्या अंतर्गत विविध शाळांना भेट देऊन तेथील शिक्षकांना व केंद्र प्रमुख यांना भेटून स्पर्धा परीक्षा बाबतीत माहिती देऊन परीक्षेचे पत्रक देऊन जास्तीत जास्त या स्पर्धा परिक्षेत सहभाग घेण्यासाठी शिक्षकांना सांगण्यात आले.या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, सल्लागार संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, विषय साधन व्यक्ती दिपक पाटील सर,व बैसाणेसर, समिक्षा लाड,तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख व शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here